धक्कादायक..! अभिनेत्रीवर बलात्कार करून मागितली खंडणी; म्हणे, पैसे दिले नाहीत तर ब्ल्यू फिल्म बनवेन...

 

पुणे : अभिनेत्रीसोबत लैंगिक अत्याचार करून त्‍यांचे एकांतातील फोटो व्हायरल करून व ब्लू फिल्म बनविण्याची धमकी देऊन खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूडचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात बॉलीवूडमधील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश माल्या, अभिजित गणपत साठे व साठे याच्या औंध येथील बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर भागात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०१७ ते २१ जुलै २०२१ दरम्यान हा प्रकार घडला आहे. तरुणीने काही लघुपटांत तसेच मॉडेल म्हणून सुद्धा काम केले आहे. यादरम्यान अभिजित साठे याच्यासोबत तिची ओळख झाली. तुला चित्रपटात काम देतो, फोटो शूट कंपनी काढू, असे आमिष साठे याने तरुणीला दाखवले. त्यासाठी शरीरसुखाची मागणी केली.

साठेने तिच्यासोबत वेळोवेळी जबदस्ती शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर दोघांचे एकांतात काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी साठे याने तरुणीला दिली. तिच्याकडून ६ लाख ४१ हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा १० लाख रुपयांची खंडणी मागितली. यात राजेश माल्या यानेसुद्धा साठेला मदत केली. राजेश माल्या याची मुंबईत मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंट नावाची कंपनी आहे. ही कंपनी चित्रपटांना कॅमेरा आणि लायटिंगचे साहित्य भाड्याने  देते. याप्रकरणाचा तपास वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कथले करीत आहेत.