धक्कादायक! कार अडवून पतीच्या डोक्याला बंदूक लावत पत्नीवर दोन गुंडांचा सामूहिक बलात्कार!!

 
file photo
इंदौर : पती व मुलासोबत फिरायला गेलेल्या विवाहितेवर गुंडांनी बलात्कार केल्याची घटना मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात समोर आली आहे.राघोगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आरोन रोडवर ही घटना घडल्याचे ३२ वर्षीय महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

गुना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली. महिला पती व लहान मुलासोबत फिरायला गेली होती. परतत असताना आरोन रोडवर जंगल परिसरात दोन गुंडांनी त्यांची कार अडवली. एकाने कारचा दरवाजा उघडून तिच्या पतीच्या डोक्यावर बंदूक ठेवली तर दुसऱ्याने महिलेला उचलून जंगलात नेत तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर ज्याने महिलेच्या पतीच्या डोक्याला बंदूक लावली. त्यानेही बलात्कार केला. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास गुंडांनी पती- पत्नीला मारण्याची धमकी दिली. दोन्ही गुंड आपसात बोलताना सुमेर आणि सोनू नावाने एकमेकांना हाक मारत होते, असेही महिलेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ तपासाला गती देऊन सुमेरसिंह परमार आणि सोनू उर्फ राजवीर सिंह यादव(३२) यांनी दलालवाडा या गावातून अटक केली आहे.