"...ती दुसऱ्या दिवशी माझ्याकडे येईल'; धमकी ऐकताच त्यांनी मोडलं लग्न!
पोलीस नाईकाच्या त्रासाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबल महिलेची आत्महत्या
Nov 5, 2021, 17:21 IST
मुंबई ः ज्या घरी तिचं लग्न ठरलं होतं तिथे जाऊन त्यानं धमकावलं होतं. तुमच्या मुलासोबत तिने लग्न केलं तरी दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे येईल. त्यामुळे तिच्याशी लग्न करू नका... असे त्याने बजावलं होतं. त्यामुळे वसई (ता. ठाणे) पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दीपाली कदमचं लग्न मोडलं. पोलीस नाईक वाल्मिकी गजानन आहिरे याच्याकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून दीपालीने दिवाळीच्या आदल्या रात्री ३ नोव्हेंबरला मध्यरात्री घरातील अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
वाल्मिकच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तिने मेसेजमध्ये तिच्या भावाला कळवले होते. त्यामुळे वाल्मिकविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक पालघर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. दीपालीचे लग्न ठरल्यानंतर त्याने होणाऱ्या सासरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दीपाली आणि मी लग्न करणार आहे, असे त्याने तिच्या होणाऱ्या सासरच्या मंडळींना सांगितले होते.