खळबळजनक! शाहरुख खान आणि आमिर खान मध्ये पैशांचा वाद ! शाहरुख खान ने मारला आमिर खानला चाकू...

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दारू पिण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. याला शाहरुख खान आणि आमिर खान देखील अपवाद नाहीत. दारुपायी शाहरूख खान आणि आमिर खान मध्ये चांगलाच वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की शाहरुख खानने आमिर खानवर सपासप चाकूने वार केले. या हाणामारीत आमिर खान जखमी झाला. या घटनेतील शाहरुख खान आणि आमिर खान हे दोघे तरुण शेगावचे राहणारे असून दोघेही पक्के दोस्त आहेत, मात्र दारुपायी दोस्तीत धोका झाला अन् हे कांड झालं..
   याप्रकरणी अमीर खान सलीम खान (रा. मिल्लत नगर, शेगाव ) यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अमीर घरासमोर उभा असताना शाहरुख खान चाँद खा (३२ वर्ष) हा तिथे आला. 'मला दारू पिण्यासाठी पैसे दे' असे तो म्हणाला. त्यावेळी माझ्याजवळ पैसे नाही तू माझ्याकडे पैसे मागू नको असे आमिरने म्हटले असता शाहरुख याने आमिरच्या पॅन्टच्या खिशात हात टाकला. त्यावेळी आमिरने त्याला लोटले, यातून संतापलेल्या शाहरुखने चापटा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्याने खिशातील चाकू काढून आमिरच्या डाव्या बरगडीवर व डाव्या डोळ्याच्या भुईवर मारला. यात अमीर जखमी होवून त्याच्या शरीरातून रक्त निघाले. यावेळी, तू जर का माझ्या नावाचा रिपोर्ट दिला, तर मी जेलमधून सुटल्यावर तुला जीवाने मारून टाकीन अशी धमकी शाहरुखने दिली होती. असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी शाहरुख खान चांद खान (रा. मिल्ल्त नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.