कुणी नसल्याचे पाहून घरात घुसला; विवाहितेवर लैंगिक अत्‍याचार!

 
rape
पुणे (वृत्तसंस्‍था) ः राज्‍यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पुणे जिल्ह्यात आणखी एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे एका नवविवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. १६ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांच्‍या माहितीनुसार, १६ डिसेंबरच्या दुपारी साडेबाराच्या सुमारास राजेंद्र जाधव हा २६ वर्षीय तरुण नवविवाहितेच्या घरात घुसला. विवाहितेचा पती व घरातील इतर लोक बाहेर गेलेले होते. राजेंद्रने  तिला ओढत दुसऱ्या खोलीत नेले. आतून दरवाजा बंद केला आणि तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी राजेंद्रविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.