रामदास आठवले म्‍हणतात, भाजपला हरविणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही..!

 
मुंबई ः उत्तर प्रदेशात जी मंडळी भाजप सोडून गेली. यामुळे त्यांचेच नुकसान होणार असून, त्यांच्या जाण्याने भाजपला काहीएक फरक पडणार नाही. भाजपला हरविणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असे टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकरांना वगळून रिपब्लिकन ऐक्य केले जाणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्‍हटले होते. त्‍यावर रामदास आठवणे म्‍हणाले, की  आंबेडकरांना वगळून रिपब्लिकन ऐक्य शक्य नाही. आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत चांगली मते मिळाली. मात्र, मते खाण्याच्या आंबेडकरांच्या भूमिकेच्या मी विरोधात आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्ट केले.