तीन वर्षे डेट केल्यानंतर अश्लील फोटो सोशल मीडियावर!
उच्चशिक्षित असूनही तरुणी फसली जात असेल तर बाकीच्यांनीही यातून बोध घ्यावा, असे मत व्यक्त होत आहे. सुधांशूने सोशल मीडियावर तिच्या नावाने फेक प्रोफाइल तयार केली. त्यावर तिने अश्लील फोटोदेखील शेअर केले. तिचा फोन नंबरही त्या प्रोफाइलवर टाकला. यानंतर तरुणीला वेगवेगळ्या नंबरवरून नको नको त्या मागणीचे कॉल येऊ लागले. अनेकांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी सुरू केली. त्यामुळे घाबरून गेलेल्या तरुणीने तातडीने पोलीस ठाणे गाठले.
असे लावले गळाला...
सुधांशूने भारत मेट्रोमनी साईटवर त्याची नोंदणी केली. नंतर मुली शोधताना त्याने या तरुणीला रिक्वेस्ट टाकली. तिचा नंबर मिळवला आणि संपर्क केला. यातून दोघांची ओळख झाली. दोघांची भेटही झाली.२०१६ ते २०१९ पर्यंत दोघे रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर मात्र सुधांशूने अचानक दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा उरकला. तिला हे कळताच तिने त्याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा त्याने आणि त्याच्या घरच्यांनी तिला दवाखान्यात येऊन शिविगाळ केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने ती काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन करून तिची बदनामी केली.