पोलीस अधिकारी महिलेचे लैंगिक शोषण, मुलासमोर ठेवले अनैसर्गिक संबंध!
२०१३ पासून लैंगिक शोषण सुरू असल्याचे पीडित अधिकारी महिलेने म्हटले आहे. ठाकूर याची पुण्यात बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. ३३ वर्षीय पीडितासुद्धा पुण्यातीलच एका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षक आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे, की ठाकूरने पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट झाल्याची खोटी माहिती तिला दिली. त्यानंतर तिच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर त्याने सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत अनैसर्गिक अत्याचार करत राहिला.
तिच्या ५ वर्षीय मुलासमोर त्याने तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोपही तिने केला आहे. २०१५ साली मुंबईला घरी असताना त्याने तिला जीवे मारण्याच्या हेतूने गोळी झाडल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी तिच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्या दबावाला घाबरून तिने इतके दिवस तक्रार दिली नाही. मात्र तो लग्नाची नोंदणी करण्यास टाळाटाळ करत असल्याने तिने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास खडकी पोलीस करत आहेत.