१० पैकी एकच पुरुष वापरतो कंडोम! कुटूंब नियोजनात पुरुषांपेक्षा महिलाच पुढे!!
देशात केवळ १० पैकी १ व्यक्तीच कंडोमचा वापर करीत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले. नसबंदीचे नाव घेताच पुरुषांना घाम सुटतो. नसबंदी केल्यास शारीरिक दुर्बलता येईल. पौरुषत्व गमवावे लागेल, अशी भीती पुरुष मंडळींना वाटते. मात्र दुसरीकडे परिवार नियोजनासाठी महिला पुढाकार घेतात. १० पैकी ४ महिला नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतात, असेही सर्वेक्षणात समोर आले आहे.
...म्हणून पुरुष कंडोम वापरत नाहीत!
देशात केवळ ९.५ टक्के लोकांनीच कंडोमचा वापर केल्याचे समोर आले आहे. देशातल्या २३ राज्यांत कंडोमच्या वापराचे प्रमाण हे १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. उत्तराखंड राज्यात २५.६ टक्के लोकांनी तर केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगढमध्ये ३१ .१ टक्के लोकांनी कंडोमचा वापर केला. देशातील ८२ टक्के लोकांना कंडोम वापराचे फायदे माहीत असले तरी अनेक लोकांना कंडोम वापरणे आवडत नाही. त्यामुळे अपेक्षित शरीरसुख मिळत नसल्याचे लोकांना वाटते.