सुटीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन् शिक्षकाने संधी साधली...!
वर्धा ः गेल्या सप्टेंबरमध्ये पोळा सणानिमित्त क्लासला सुटी होती. पण ९ सप्टेंबरला १६ वर्षीय मुलगी चुकून क्लास गेली. वर्गात एकही विद्यार्थी नसल्याने शिक्षकाने ही संधी साधली आणि तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतरही १२ सप्टेंबर आणि २० सप्टेंबरला त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला... दोन दिवसांपूर्वी पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिच्या पालकांनी तिला आर्वीच्या रुग्णालयात नेले. तिथे ती चक्क प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षकाने बिंग फुटले. वर्धा जिल्ह्याच्या तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तळेगाव पोलिसांनी वासनांध शिक्षकाविरुद्ध पोस्कोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
राहुल भारती असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्लासेस घेताे. पीडित मुलीचा आठवीपासून शिक्षकाकडे क्लास लावलेला आहे. राहुलने अनेकदा तिच्याशी गृहपाठ तपासण्याच्या निमित्ताने असभ्य वर्तन केले आहे. सप्टेंबरमध्ये पोळा सणानिमित्त दोन दिवस सुटी असताना मुलगी ९ सप्टेंबरला दुपारी चुकून क्लासला नेहमीप्रमाणे आली. यावेळी वर्गात कुणीच नव्हते. राहुलने ही संधी साधून तिच्याशी बळजबरी लैंगिक संबंध बनवले. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतरही राहुल थांबला नाही. त्याने १२ आणि २० सप्टेंबरला पुन्हा तिला वासनेची शिकार बनवले. दोन दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला आर्वीच्या रुग्णालयात नेले तेव्हा प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.