NATIONAL NEWS पृथ्वीवासीयांसाठी "हा" दिवस धोक्याचा! लघुग्रह धडकण्याची शक्यता; "तर आपण सर्व नामशेष होऊ!"इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा इशारा;इतिहासाचा दिला दाखल....
- इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी पृथ्वीवासीयांना एक मोठा इशारा दिला आहे. ३७० मीटर व्यासाचा एक लगुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असून तो पृथ्वीला धडकण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. याआधी १९०८ च्या जून महिन्यातील ३० तारखेला असाच एक लघुग्रह पृथ्वीला धडकला होता. तेव्हा झालेल्या स्फोटात २२०० चौरस किलोमीटर एवढे जंगल नष्ट झाले होते. सायबेरियातील तुंगुस्का नामक दुर्गम भागात हा अपघात झाला होता. या धडकेत सुमारे ८ कोटी झाडे नष्ट झाली होती.
दरम्यान आता जो लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत आहे तो १३ एप्रिल २०२९ रोजी जाण्याची शक्यता आहे. असे लघुग्रह जेव्हा पृथ्वीवर आदळतात तेव्हा पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट होतात. अशाच एका घटनेमुळे पृथ्वीवरून डायनासोर नष्ट झाल्याचे मानले जाते.
जागतिक लघुग्रह दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाले की, आपला मनुष्याचा जीवनकाल साधारणता ७० ते ८० वर्षाचा असतो. त्यामुळे लघुग्रह धडकण्याच्या घटना होऊ शकतात असे आपल्याला पटत नाही, कारण अशी आपत्ती आपण आपल्या आयुष्यात सहसा पाहत नाही. मात्र अशा घटना हजारो, शेकडो वर्षातून एखादा वेळेस घडतात. जगाचा आणि विश्वाचा इतिहास बघितल्यावर ही बाब आपल्या लक्षात येईल.त्यामुळे पृथ्वीवर एखादा लघुग्रह धडकला तर आपण नामशेष होऊ शकतो असे ते श्री. सोमनाथ म्हणाले. ही वास्तविक शक्यता आहे त्यामुळे आपण स्वतःला तयार करायला पाहिजे. पृथ्वीवर असे काही घडू नये अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे, मानवासह सर्व जीवांनी इथे राहायला पाहिजे असे आपल्याला वाटते मात्र आपण हे रोखू शकत नाही. यासाठी आपण पर्याय शोधायला हवे. आपण पृथ्वीजवळ येणारा लघुग्रह शोधू शकतो आणि त्याला दूर करू शकतो मात्र कधी कधी हे अशक्य होऊन बसते. त्यामुळे तंत्रज्ञान अधिक विकसित करण्याची गरज असल्याचे इस्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले . यासाठी इतर देशांसोबत संयुक्तपणे काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.