कुठेही जाणार नाहीत मुकेश अंबानी!; भारतातच राहणार!!
Nov 7, 2021, 12:47 IST
मुंबई ः देशातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी लंडनच्या बकिंगहॅमशायर शहरात तब्बल ३०० एकरची मालमत्ता खरेदी केली असून, तिथल्या आलिशान घरात ते लवकरच शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र रिलायन्सकडून याबद्दल नुकतेच स्पष्टीकरण देण्यात आले असून, मुकेश अंबानी लंडनमध्ये शिफ्ट होणार नाहीत.
असल्या बातम्यांत कोणतेही तथ्य नाही. स्टोक पार्क इस्टेटमध्ये रिलायन्सने खरेदी केलेल्या मालमत्तेचा मुख्य हेतू तिथे अत्याधुनिक सुविधांचं गोल्फ क्लब आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट सुरू करणे आहे, असे स्पष्टीकरणात म्हटले आहे. मिड-डेने आपल्या वृत्तात लंडनच्या घरात तब्बल ४९ बेडरूम आणि अत्याधुनिक उपचार सुविधा असल्याचे म्हटले होते. अंबानींनी तब्बल ५९२ कोटींना ही मालमत्ता खरेदी केल्याचे म्हटले होते.