लिव्ह इन रिलेशनशिप... तिने शरीरसंबंधाला नकार देताच त्‍याने तव्यानेच हात, पोटावर केले वार, पेनाने केल्या जखमा!

 
rape
पिंपरी : हल्ली भारतात सुद्धा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे फॅड वाढले आहे. लग्न न करताच जोडपे जेव्हा एकत्र राहू लागतात तेव्हा त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. पिंपरी चिंचवडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला याची चांगलीच किंमत मोजावी लागली आहे.
२५ वर्षांची तरुणी योगेश्वर शशिकांत पगारे (२५, रा. मारुंजी, पुणे) याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. ६ जानेवारी रोजी योगेश्वरने तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र तिची त्यावेळी इच्छा नसल्याने तिने योगेश्वरला नकार दिला. त्यामुळे योगेश्वरचा संताप अनावर झाला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. योगेश्वरने किचनमधील स्टिक तव्याने तरुणीच्या हातावर  व पोटावर मारहाण केली. प्लास्टिकच्या पेनने तरुणीच्या हातावर जखमा केल्या. तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर योगेश्वरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.