जावेद हबीब महिलेच्या केसांवर थुंकला! म्हणाला, माझ्या थुंकीत जीव!!

 
लखनौ ः देशातील प्रसिद्ध हेअर डिझायनर जावेद हबीब यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो एका महिलेच्या केसांवर थुंकताना दिसत आहे. माझ्या थुंकीत जीव आहे, असे जावेद हबीब म्हणत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलेने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली असून, जावेद हबीब याने माझ्या केसांत थुंकून अपमान केल्याने या महिलेने म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा गुप्ता असे या महिलेचे नाव असून, त्या बागपत जिल्ह्यातील बरोत येथील राहतात व ब्युटी पार्लर चालवतात. मुजफ्फरनगरमध्ये ब्युटी पार्लर आणि मेकअपवर एक सेमिनार होता. या सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी पूजा गुप्ता यांनी अडीच हजार रुपये फी भरली होती. कारण त्यांना जावेद हबीब याला भेटण्याची संधी मिळणार होती.

सेमिनार सुरू झाल्यानंतर प्रॅक्टिकल दरम्यान  केसांची देखभाल आणि शाम्पूचे महत्व सांगताना जावेद हबीब पूजा गुप्ता यांच्या केसांत दोनदा थुंकला. महिलेचे केस कोरडे असल्याचे म्हणत तो केसांत थुंकला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. माझ्या केसांत थुंकून माझा जाहीर अपमान जावेद हबीब याने केलाय, असे महिलेचे म्हणणे आहे.

तिने पोलिसात तक्रार केली आहे. माझी नऊ वर्षांची कारकीर्द संपली. मी गल्लीतल्या न्हाव्याकडून केस कापून घेईल पण वर्कशॉप मध्ये केस कापणार नाही, असे महिला म्हणाली. यासंदर्भात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली असून, जावेद हबीब याच्यावर कठोर कारवाईची मागणी केल्याचेही महिलेने सांगितले.