आमचं मरण इतकं स्वस्त झालय का? बुलडाणा जिल्ह्यात अपघात होऊन नऊ - दहा तास उलटलेत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम च्या खासदार भावनाताईंना शुभेच्छा द्यायला विसरले नाहीत,
मात्र एसटी बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबाबत चकार शब्दही नाही! देवेंद्र फडणवीसांना "ती" पोस्ट टाकायला जमल पण....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी ट्विटर वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील अपघात ग्रस्तांच्या बाबतीत अद्याप कोणतेही ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन मंत्रालयाचा कारभार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील अद्याप बुलडाणा जिल्ह्यातील अपघाताची नोंद घेतल्याचे दिसत नाही.
देवेंद्र फडणवीसांना "ती" पोस्ट टाकायला जमल पण....
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतात असं त्यांच्याबद्दल बोलल जात. अर्थात त्यात सत्यता देखील आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील अपघाताची माहिती त्यांच्यापर्यंत अद्याप पोहचली नसावी.. कालच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सोशल मीडियावर एसटी प्रवास भाडे स्वस्त झाल्याबद्दल पोस्ट केली होती. भाग्यश्री पटवर्धन नावाच्या महिलेने नागपूर ते अमरावती एसटी बसने प्रवास केला, आणि त्याच्या तिकिटाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करून एवढा स्वस्त प्रवास असा उल्लेख केला होता. ती पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केली होती. मात्र बुलडाणा जिल्ह्यात अपघात होऊन १० तास उलटूनही त्यांच्या कार्यालयाकडून या अपघाताबद्दल चकार शब्दही काढण्यात आला नाही...