Info : या चार राशींचे लोक असतात गोडबोले; गोड गोड बोलून करून घेतात काम...

 
व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं म्हणतात. काही लोक त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्यांना प्रभावित करून आपलंसं करतात. गोड बोलण्यात काही माणसं माहीर असतात. गोड गोड बोलून ते समोरच्याकडून आपले काम करून घेतात. ज्योतिष शास्त्रानुसार जन्मकुंडलीचा अभ्यास करून त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्यातील घटना, भूतकालीन गोष्टींचा अंदाज बांधता येऊ  शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही लोकांची वाणी अतिशय रसाळ असते. यामुळे समोरचे लोक अतिशय आकर्षित  होतात.
  • कर्क राशीचे लोक बोलण्यात अतिशय चतुर असतात. गोड बोलून काम कसे करून घ्यावे हे कर्क राशीच्या लोकांकडून शिकावे. कर्क राशीचे लोक शक्‍यतोवर कुणाशीही वाद घालत नाहीत. मात्र तरीही मनाला पटेल तेच या व्यक्ती करतात. कर्क राशीच्या लोकांचा लोकसंपर्क मोठा असतो.
  • कन्या राशीचे लोक दिखाऊपणा करण्यात पटाईत असतात. एखाद्याशी बोलताना कन्या राशीचे लोक असे दाखवतात की ते त्या व्यक्तीचे खूपच शुभचिंतक असतात. कन्या राशीच्या व्यक्तीच्या मनात नेमके काय सुरू आहे तेच कळत नाही. कन्या राशीच्या लोकांना समाजात चांगला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा लाभते.
  • वृश्चिक राशीचे लोक गोड बोलण्यात दुसऱ्या क्रमांकावर असतात. हे लोक अनेकदा प्रामाणिक असल्याचा आव आणतात. देखावा करतात असे म्हटले जाते. या राशीच्या लोकांच्या मनात काय सुरू आहे हे सहजासहजी ओळखता येत नाही. एखादी गोष्ट सांगायची असल्यास हे लोक सरळसरळ सांगत नाहीत. हे लोक असे बोलतात की समोरची व्यक्ती आपोआप जाळ्यात अडकते. तोंडावर खूप गोडगोड  बोलायचे आणि मागून मात्र नाव ठेवायची असा स्वभाव या लोकांचा असतो.
  • मीन राशीच्या लोकांना गोड गोड बोलून काम कसे करायचे हे चांगलेच जमते. या राशीच्या लोकांना आभासी जगात जगायला फार आवडते. समोरच्या लोकांना आपलं करण्यात हे लोक फार पटाईत असतात.