Info : पुरुषांनो "याच' कारणांमुळे तुमच्यातील महिलांचा इंटरेस्ट होतोय कमी!

 
file photo
मुंबई ः आधी मी तुला खूप आवडायचो... आता मी का आवडत नाही... तुझे माझ्यावरील प्रेम कमी होताना दिसतंय... असे अनेक प्रश्न पुरुष त्यांच्या महिला जोडीदारांना विचारताना दिसतात. काही जण थेट तसा प्रश्न विचारत नसले तरी तिचे आपल्यावरील प्रेम कमी होतेय. आधीचे आकर्षण कमी होतेय, ही सल असतेच. तशीच सल महिलांनाही असते. मी आता त्याला आवडत नाही... असे महिलांनाही वाटू लागते. जर समोरच्याला आपल्या प्रेमाची, भावनांची किंमत नाही असे वाटले तर जोडीदाराबद्दल रस कमी होतो हे शाश्वत सत्यच आहे. महिला जास्त संवेदनशील असल्याने आपल्यावरील त्याचे प्रेम कमी झाले असे विचार सातत्याने त्यांच्या मनात येत असतात. पण जोडीदाराबद्दलचे प्रेम कमी का होत असेल, स्रियांना असे का वाटत असेल? जाणून घेऊयात...
  • नवा जोडीदार ः  महिलांच्या मनातून तेव्हाच आपल्या पार्टनरबद्दलचा रस कमी होताे, जेव्हा त्यांची भेट त्यांच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या पुरुष जोडीदाराशी होते. महिलेच्या वैवाहिक आयुष्यात काही तरी मिसिंग आहे याची अप्रत्यक्ष जाणीव नवा जोडीदार करून देतो. त्यामुळे महिला नव्याकडे आकर्षित होतात. त्यांचे पतीवरील प्रेम दिवसेंदिवस कमी होते. संसारात तोचतोपणा जाणवू लागल्याने सुद्धा महिला दुसरा पुरुष शोधतात.
  • शरीरसंबंध ः शरीरसंबंध संसाराची गरज आहे. आज आधुनिक युगात सुद्धा ही गोष्ट चारचौघांत बोलणे निषिद्ध मानले जाते. मात्र सेक्स लाईफ व्यवस्थित नसेल तर महिला आणि पुरुष दोन्हीही खुश राहू शकत नाही. महिला सेक्स करताना लवकर संतुष्ट होत नाहीत. अशावेळी तिला सुख देण्याची जबाबदारी पुरुषाने निभावली पाहिजे. मात्र पुरुष केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करत असतील तर महिलेच्या मनात पतीविषयी नकारात्मक विचार येतात. घर आणि जॉब सांभाळणाऱ्या महिला सततच्या कामाला कंटाळतात. या लाईफमधून सुटका हवी असे त्यांना वाटत असते. अशावेळी घराची जबाबदारी सांभाळताना पतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल तर आपण चुकीच्या संसारात अडकलो आहोत, असे  महिलांना वाटू लागते आणि त्या नवा जोडीदार शोधू लागतात.