Info : हातात पैसे टिकत नाहीत? आर्य चाणक्यांनी सांगितलेल्या या ४ गोष्टी लक्षात ठेवा...

 
आपल्या घरात कधीच पैशांची कमतरता भासू नये, असं प्रत्येकाला वाटतं. आपण पैसे तर खूप कमावतो मात्र हातात टिकतच नाही, अशी अनेकांची तक्रार असते. आयुष्यात प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावे असे वाटते. पण पैसा जपण्याचे कौशल्य प्रत्येकाकडे असेलच असे नाही. तुम्हालाही पैसा जपण्याचे कौशल्य शिकायचे असेल तर आर्य चाणक्यांनी सांगितलेल्या चार गोष्टी जाणून घेण्याची आणि त्या अवगत करण्याची आवश्यकता आहे...
  • आर्य चाणक्य यांच्यामते, तुमच्याकडे कितीही पैसा येत आला तरी विनम्रता सोडू नका. विनम्र व्यक्ती सर्वांनाच आवडतात. अशा लोकांना आयुष्यात अधिक संधी मिळतात. त्यामुळे ते संपत्ती वाढविण्यात यशस्वी होतात. अहंकारी माणसांकडे पैसा फार काळ टिकत नाही. त्यामुळे नेहमी विनम्र रहा आणि पैशांचा अहंकार बाळगू नका.
  • काही लोक स्वतःजवळील पैसा दाखवून गरिबांना अपमानित करतात. हे अतिशय मूर्खपणाचे लक्षण आहे. असे लोक आपल्याकडे किती पैसे आहे हे दाखविण्यासाठी स्वतः कडील पैसा वाया घालवतात. त्यामुळे समोरील व्यक्तींच्या मनात अशा लोकांबद्दल आदर राहत नाही. तुमच्याकडे पैसे असले तरी ते फालतू खर्च करणे टाळा, असे आर्य चाणक्य सांगतात.
  • जर तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल तर तो लोकांच्या हितासाठी, लोककल्याणकारी कामांसाठी गुंतवा. पैशांचा चांगला विनियोग केल्याने तुम्हाला मानसन्मान सुद्धा मिळतो आणि तुमच्या घरात नेहमी समृद्धी टिकून राहते. त्‍यामुळेच शास्त्रात दानधर्म आणि परोपकाराची कामे करण्याचे सांगितले आहे.
  • आर्य चाणक्य सांगतात, की पैसे कधीही सोबत ठेवू नका. थांबलेली कोणतीही गोष्ट चांगली आणि उपयोगाची नसते. पैशाची गुंतवणूक करा. त्यामुळे संपत्ती वाढते. ज्या लोकांना पैसा साठवून ठेवायची सवय आहे, त्यांची संपत्ती हळूहळू नष्ट होते.