कॅटरिनाचा रेट किती माहितेय का?

 
file photo
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा लग्नसोहळा नुकताच धूमधडाक्‍यात पार पडला. ७ ते ९  डिसेंबर दरम्यान राजस्थानच्या सवाई माधोपुर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये राजेशाही थाटात हा सोहळा झाला. या लग्नाचे आणि इतर विधींचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँडच्या एका सर्वेक्षणानुसार, कॅटरिना आणि विकी पॉवरफुल कपलच्या यादीत जगात नवव्या स्थानी आहेत. कॅटरिनाकडे कोट्यवधी रुपयांची संपती आहे.

सिनेमाच नाही तर जाहिराती आणि व्यवसायांमधून सुद्धा ती दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करते. सिनेमासोबत ब्युटी ब्रँड आणि प्रॉपर्टीमध्ये सुद्धा ती गुंतवणूक करते. २०१९ मध्ये फोर्ब्स इंडियाच्या यादीत कॅटरिनाची मिळकत वार्षिक २३ कोटी ६३ लाख इतकी होती. कॅटरिना एका सिनेमासाठी १० ते ११ कोटी रुपये मानधन घेते. एका जाहिरातीसाठी ती किमान ५ कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त रक्कम आकारते.

एखाद्या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारत असेल तर त्यासाठी १ ते ३ कोटी रुपयांचे ती मानधन घेते. फोटोशूटसाठी सुद्धा २ ते ५ कोटी रुपयांचे कॅटरिना मानधन घेते. लोखंडवाला येथे तिचं स्वतःचं घर आहे. हे घर तिने १७ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. याशिवाय वांद्रे भागातही थ्री बीएचकेचे एक घर तिच्या नावावर आहे. त्या घराची किंमत ८ ते ९ कोटी रुपये आहे. तिच्याकडे अनेक अलिशान गाड्या आहेत.