अंचरवाडीत आज हिंदुत्वाची तोफ धडाडणार! भाग्यश्री मोहितेंचे जाहीर व्याख्यान; हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 
bhagyshrimohite
अंचरवाडी ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्रातील नामवंत युवा व्याख्याता व हिंदुत्वाची बुलंद तोफ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भाग्यश्री मोहिते यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन अंचरवाडी येथे करण्यात आले आहे. आज,२९ मार्चला संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी उसळणार आहे. 
 

 श्री. रामनवमी निमित्त विश्व हिंदू परिषद,बजरंग दलाच्या अंचरवाडी शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मूळच्या परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भाग्यश्री मोहिते त्यांच्या वक्तृत्वाने महाराष्ट्रभर परिचित आहेत. अतिशय कमी वयात त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हिंदुत्वाच्या विषयावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात त्यांची आतापर्यंत हजारो व्याख्याने पार पडली आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे अंचरवाडी येथे होणाऱ्या व्याख्यानाची गावकरी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या अंचरवाडी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.