अल्पवयीन मुलीला पडक्या इमारतीत घेऊन जायचा... ती राहिली प्रेग्नंट!; मुलीला दिला जन्म

 
RAPE
नाशिक : जवळचा नातेवाइक असलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. नाशिक शहरातील गांधीनगर भागात ही घटना उजेडात आली आहे. बॉबी ऊर्फ पियुष चौहान असं आरोपीच नाव असून तो सध्या फरारी आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार बॉबी हा पीडित मुलीच्या अतिशय जवळचा नातेवाईक आहे. ओळखीचा गैरफायदा घेऊन तो मुलीला गांधीनगर भागातील पडित इमारतीत घेऊन जात होता. तेथील एकांताचा फायदा घेत त्याने तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. फेब्रुवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत वारंवार घडलेल्या या संबंधातून मुलगी प्रेग्नंट राहिली. त्यामुळे या प्रकाराची वाच्च्यता झाली. नुकताच मुलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून बॉबी उर्फ पियुष चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील गांधीनगर  सरकारी वसाहत एकेकाळी गजबजलेली राहत होती. मात्र या भागात आता कामगारांचे वास्तव्य नाही. कामगार बाहेर स्वतःचे घर घेऊन राहत असल्याने हा परिसर ओस पडला आहे. त्यामुळे या परिसरात गैरकृत्य वाढले आहेत. दारुड्यांचा अड्डा म्हणून सुद्धा हा भाग ओळखला जातो.