घरात घुसून महिलेचा मोबाइल चोरला... त्यानंतर फोनवरून केली तिला शरीरसुखाची मागणी!

 
rape
पुणे : महिलेचा विनयभंग केल्याचे एक विचित्र प्रकरण पुणे शहरातील रहाटणी भागात समोर आले आहे. दोन तरुणांनी घरात घुसून २७ वर्षीय महिलेचा मोबाइल पळवला. त्यानंतर तिने मोबाइलवर फोन केल्यावर दोघांनी शरीरसुखाची मागणी केली. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून, तक्रारीवरून वाकड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पंकज हरिप्रसाद बाजुळगे (२५, रा. रहाटणी, पुणे) आणि मंगेश माने (२३, रा. कात्रज, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी भरदुपारच्या सुमारास तिच्या घरात घुसून पंकज आणि मंगेशने मुलीच्या हातून मोबाइल हिसकावला व पळ काढला. महिलेने जेव्हा तिच्या मोबाइलवर फोन केला तेव्हा पंकज आणि मंगेश यांनी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली व अश्लील बोलत विनयभंग केला. अखेर महिलेने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पंकज व मंगेश विरुद्ध विनयभंग व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.