तो बनला "हम दिल दे चुके सनम'मधला अजय.. पत्नीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास कुमार असं या त्यागी नवऱ्याच आहे. तो मूळचा बिहारचा आहे. पहिल्या पत्नीचं निधन झाल्याने दोन वर्षांपूर्वी त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले होते. शिवानी असं त्याच्या दुसऱ्या बायकोचं नाव आहे. त्यानंतर तो शिवानीला घेऊन नोकरीनिमित्त बंगरूळुला आला होता. एक दिवस शिवानीच्या सामानात विकासला एका तरुणाचा फोटो सापडला.
त्यानंतर शिवानीच्या प्रियकराचा हा फोटो असल्याचे विकासला समजले. सचिन असं शिवानीच्या प्रियकराचं नाव आहे. तोसुद्धा मूळचा बिहारचा आहे. प्रेयसीचं लग्न झाल्यावर तो सुद्धा बंगरूळुला आला. त्यानं तिथं नोकरी मिळवली आणि प्रेयसीला भेटू लागला. विकासने शिवानीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकायलाच तयार नव्हती. सचिनच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती. सचिनही तिच्या प्रेमात वेडा झाला होता. काहीही करून पुन्हा सचिनला मिळवायचेच, असा निश्चय शिवानीने केला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून विकासने शिवानी आणि सचिनचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. लग्न लावून देत त्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला.