साखरपुडा होताच भावी नवरीशी ठेवले शरीरसंबंध!! नंतर म्हणाला, लग्न जमणार नाही!!, बर्थ डे पार्टीत साधली होती संधी
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूरच्या युवतीचे भंडारा येथील तरुणाशी जानेवारी २०२१ मध्ये लग्न ठरले. फेब्रुवारी २०२१ मध्ये साखरपुडा झाला. एप्रिलमध्ये लग्न ठरले होते. मात्र कोरोनामुळे विवाह समोर ढकलण्यात आला. मेमध्ये तरुणीला कोरोना झाल्याने लग्न दुसऱ्यांदा समोर ढकलावे लागले. जूनच्या पहिल्या आठवड्यात तरुणीचा वाढदिवस होता. त्यामुळे तिच्या भावी नवऱ्याने वाढदिवसानिमित्त उमरेड येथील एका रिसॉर्टवर पार्टी ठेवली. या पार्टीत त्याचे मित्रही आले होते.
रात्री तरुण त्याच्या होणाऱ्या बायकोच्या खोलीत शिरला. त्याने शरीरसंबंधाची मागणी केली. आपले लग्न होणारच आहे. आपण होणारे नवरा बायकोच आहोत, असे म्हणत त्याने रिसॉर्टवर त्या रात्री तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मात्र तो तिला टाळू लागला. नंतर तरुणी आपल्याला अनुरूप नाही, असे सांगत लग्न मोडत असल्याचे सांगितले. त्यामुळे तरुणीने उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.