आनंदाची बातमी! मुहूर्त ठरला; शेतकऱ्यांच्या खात्यावर "या" दिवशी जमा होणार ४ हजार रुपये! केंद्र सरकार देणार २ हजार आणि राज्य सरकार देणार २ हजार..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत वर्षातल्या ३ हफ्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार असे एकूण वर्षाला ६ हजार रुपये जमा होतात. देशातला प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे. आतापर्यंत या योजनेचे १३ हफ्ते वितरीत झाले आहेत. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने देखील यात भर टाकण्याचा निर्णय घेत नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली होती. मात्र या योजनेचा शुभारंभ अजून झाला नव्हता. आता शिंदे - फडणवीस सरकारने या योजनेचा शुभारंभ करण्याची तारीख निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकारीक स्थरावरून याची पुष्टी झाली नसली तरी कृषी दिनी अर्थात १ जुलै रोजी या योजनेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
त्याचदिवशी केंद्राच्या योजनेचा १४ वा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. अशारीतीने केंद्राचे २ आणि राज्याचे २ असे एकूण ४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जे शेतकरी योजनेसाठी पात्र असूनही त्यांना या योजनेचा लाभ मिळत नसेल त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन केवायसी प्रक्रिया अपडेट करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.