गे सेक्स रॅकेट उघडकीस!; मुंबईत तिघांना अटक, हायप्रोफाइल ग्राहकही रडारवर
Jan 19, 2022, 13:37 IST
मुंबई : ऑनलाइन डेटिंग ॲपच्या माध्यमातून गे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या तिघांना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यक्तीने आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हे रॅकेट समोर आले. या रॅकेटमध्ये हायप्रोफाइल ग्राहकही सामील असल्याचे समोर आले आहे. अटक केलेले तिघे लोकांना ब्लॅकमेल करत होते.
मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हसन मुलानी यांनी सांगितले, की एका पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर धक्कादायक असे गे रॅकेट समोर आले. पीडित व्यक्तीला पाच जणांनी धमकावून रोकड आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले होते. त्या व्यक्तीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. आता या रॅकेटमध्ये अडकलेल्या हायप्रोफाइल ग्राहकांनाही पोलिसांनी रडारवर घेतले आहे.