पाच तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करत होत्या..!
मनीष ऊर्फ विक्की प्रेमनारायण जयस्वाल (३२ रा. फ्रेंड्स कॉलनी, नागपूर), राहुल विकास रामटेके ( ३० रा. मोहाडी जि.भंडारा), टिकेंद्र वधाराव सावजी ( ३२, मूळ रा. झारखंड) व रोहितकुमार सुरेश शाहू (२८ ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. शिवम बारमध्ये हा डान्सबार सुरू होता. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी सावनेर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांनी पथकासह बारवर छापा मारला.
छापा पडताच आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करत असलेल्या तरुणी आणि ग्राहकांची एकच पळापळ सुरू झाली. मात्र पोलिसांनी कुणालाही पळून जाण्याची संधीच दिली नाही. सर्वांना ताब्यात घेऊन रोख रकमेसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. मुंबईहून "खास' कार्यक्रमासाठी या बारबाला आणल्या होत्या. मात्र कार्यक्रम ऐन रंगात आलेला असतानाच पोलिसांनी छापा मारला. शिवम बारमध्ये नेहमीच अशाप्रकारचे कार्यक्रम होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यावेळी थेट पोलीस अधीक्षकांनीच आदेश दिल्याने हा डान्सबार उधळला गेला. या ठिकाणी बारबालांवर पैसे उधळण्यासाठी अनेक प्रतिष्ठीतही येत असतात.