फेसबुक लव्ह... शरीरसंबंध, प्रेग्नंट, नंतर धोका!; विवाहिता पतीपासून राहत होती वेगळी!!

 
नागपूर : पतीशी पटत नसल्याने ३६ वर्षीय महिला मुलांना घेऊन वेगळी राहत होती. फेसबुकवरून तिची जळगावातील एका ३८ वर्षीय युवकाशी ओळख झाली. नंतर प्रेम, त्यानंतर शरीरसंबंध, गर्भपात अन्‌ मग धोका दिल्याची तक्रार विवाहितेने पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विवाहितेच्या फेसबुक फ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल केला. देवेंद्र विकास पवार (३८, रा. चांदसार, जि. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय महिला नागपुरातील जरीपटका भागात राहते. तिचे वयाच्या १८ व्या वर्षीच लग्न झाले होते. तिचा पती एका खासगी वाहनावर वाहनचालक आहे. एक मुलगा व एका मुलीची आई असताना पतीसोबत पटत नसल्याने ती मुलांना घेऊन वेगळी राहते. खासगी दवाखान्यात नर्स म्हणून काम करते. २०१७ मध्ये जळगाव येथे राहणाऱ्या देवेंद्र पवारसोबत फेसबुकवरून तिची फ्रेंडशिप झाली.

सुरुवातीला काही दिवस चॅटिंग केल्यानंतर देवेंद्रने तिला भेटायला जळगावला बोलावले. ती जळगावला गेली. देवेंद्रने मित्राच्या घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नाचे आमिष दाखवले. पतीपासून वेगळे राहत असल्याने पतीला घटस्फोट देऊन तिला देवेंद्रसोबत लग्न करायचे होते. त्यानंतर देवेंद्र नागपूरला आला. शताब्दी चौकात भाड्याने खोली घेऊन दोघे जण काही दिवस पती-पत्नी प्रमाणे राहिले.

२०१९ मध्ये महिला कुशीनगर येथे राहायला गेली. तिथेही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिला देवेंद्रपासून गर्भवती झाली. तिने गर्भपात करण्यास नकार दिल्यावर त्याने तिला पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून तिचा गर्भपात करून घेतला. नंतर लग्नास नकार दिला, अशा तक्रारीवरून पोलिसांनी देवेंद्र विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.