सहकारी महिला डॉक्‍टर, नर्ससोबत डॉक्‍टरचे अनैतिक संबंध!; पत्‍नीला माहिती झाल्याने तिच्यासोबत केले हे घाणेरडे कृत्‍य!!

 
पुणे : पुण्यात एका डॉक्टरचा विचित्र कारनामा समोर आला आहे. पुण्यातील एका नामवंत बालरोग तज्‍ज्ञाचे हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर, नर्ससोबत अनैतिक संबंध होते. बायकोला नवऱ्याच्या अफेअर्सची माहिती झाल्यावर तो बायकोला मारहाण आणि अनैसर्गिक संभोग करून त्रास देऊ लागला, अशी तक्रार डॉक्टरच्या पत्नीने पोलिसांकडे केली आहे. अमोल फुलसुंदर (४१, रा. भोसरी पुणे) असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून, भोसरीत त्याचे निरागस लहान मुलांचे हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटल आहे.
अमोल फुलसुंदर हा उच्चशिक्षित असला तरी त्याचे कृत्य सराईत गुन्हेगारासारखे आहे. हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर्स आणि नर्ससोबत त्याचे अनैतिक संबंध होते. जेव्हा पत्नीला या प्रकाराची कुणकुण लागली तेव्हा तो पत्नीला मारझोड करू लागला. अनैसर्गिक संभोग करून त्रास देत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. त्रास असह्य झाल्याने पीडित पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.