तुमच्याकडे एकापेक्षा अधिक सीम कार्ड आहे? तर होऊ शकते ही कारवाई!

 
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः तुमच्याकडे ९ पेक्षा अधिक सीमकार्ड असतील तर त्‍याचे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. अन्यथा ते बंद होणार आहेत. दूरसंचार विभागाने सर्व सीमकार्ड कंपन्यांना व्हेरिफिकेशन न हाेणारे सीमकार्ड ३० दिवसांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्‍याच्‍याकडे ९ पेक्षा अधिक सीमकार्ड आहेत त्‍यांना आधी नोटिफिकेशन पाठवले जाईल. अशा सीमकार्डची आऊटगोईंग सुविधा ३० दिवसांत बंद होईल. इनकमिंग कॉल ४५ दिवसांत बंद होतील. ग्राहक आंतरराष्ट्रीय रोमिंग वापरणारा असेल, आजारी किंवा अपंग असेल तर ३० दिवसांची आणखी सूट दिली जाणार आहे. बँक किंवा कोणत्याही आर्थिक संस्‍थेकडून मोबाइल नंबरबाबत तक्रार आली तर ५ दिवसांत असा नंबर बंद केला जाणार आहे. नियमानुसार एखादा ग्राहक जास्तीत जास्त ९ सीम विकत घेऊ शकतो. जम्मू काश्मिरमध्ये हा नियम ६ सीमपर्यंत आहे. ऑनलाइन फसवणूक, आक्षेपार्ह कॉल आणि वाईट घटना रोखण्यासाठी दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे.