उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबादेवी मंदिर परिसराच्या स्वच्छतेत तल्लीन ! म्हणाले,जेथे स्वच्छता तेथे श्रध्दा वृध्दींगत होते.

 
Df
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ठिकठिकाणच्या धार्मीक स्थळी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पुढील दिवसात होत आहे. त्यामुळे भारतभरातील श्रद्धास्थाने स्वच्छ ठेवावी असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. महाराष्ट्रात देखील स्वच्छता अभियानाला उदंड प्रतिसाद मिळतोय, त्यानुसार आज १६ जानेवारी रोजी मुंबई शहराची आरध्यदेवता आई मुंबादेवीच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता केली. हातात झाडू घेऊन सहकारी नेत्यांसोबत त्यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
 सकाळी ८ वाजेपासून मुंबादेवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियानास सुरुवात झाली. त्यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "ज्या ठिकाणी श्रद्धा आहे त्या ठिकाणी स्वच्छता असावी कारण स्वच्छतेमुळे श्रद्धा अधिक वृद्धिंगत होते.." त्यामुळे अश्या औचित्यावर हे अत्यंत समर्पक कार्य आहे. त्यांनतर त्यांनी आई मुंबा देवीचे दर्शन घेतले.