प्रणिती शिंदेंकडे काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी!

 

सोलापूर ः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पक्षाचे प्रवक्ते जाहीर केले असून, यात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांचीही निवड झाली आहे.

नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काल १६ डिसेंबर रोजी काढले. यादीत भावना जैन, गोपाल तिवारी, निजामुद्दीन राईन, सुधीर ढोणे, चारुलता टोकस, हेमलता पाटील, दिलीप एडतकर, भरत सुरेश सिंह यांचाही समावेश आहे. कपिल ढोके, बालाजी गाडे आणि शमीना शेख यांना मीडिया पॅनलिस्ट म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सडेतोड भूमिका आणि अभ्यासू वक्तव्यांमुळे प्रणिती शिंदे ओळखल्या जातात. ओवेसी हे देशद्रोही असल्याची टीका केल्यामुळे त्‍या चर्चेत आल्या होत्या.