झोप उडवणारी बातमी! जास्त मीठ खाल्ल्यास बनेल विष! डब्ल्यूएचओ ने दिला लाखो मृत्यूंचा इशारा..!
मीठ किती महत्वाचे
वास्तविक सोडियम आणि पोटॅशियम ही दोन्ही खनिजे मिठामध्ये आढळतात. सोडियम आपल्या शरीरातील पाण्याची योग्य पातळी राखण्यास मदत करते. इतकेच नाही तर शरीराच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन आणि इतर पोषक द्रव्य पोहोचवण्यात मदत होते. या महत्त्वाच्या खनिजांमुळे नसांना देखील ऊर्जा मिळते.
मिठाच्या कमतरतेमुळे..
शरीरात मिठाच्या कमतरतेमुळे कमी रक्तदाब, टाईप २ मधुमेह,अशक्तपणा आणि उलट्या होणे, चक्कर येणे, मेंदू आणि हृदयाला सूज येणे, सूज आल्याने डोकेदुखी आणि काही प्रकरणांमध्ये अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. कोमातही जाऊ शकते, मिठाच्या कमतरतेमुळे शरीराच्या अवयवांपर्यंत पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचत नाही त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
आपले पूर्वज काय सांगतात..?
विशेष म्हणजे मीठ आरोग्यासाठी चांगले नसल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटना करत आहे. पण आपल्या पूर्वजांनी मात्र जेवणात मिठाचा वापर खूपच कमी असायला हवा असे हजारो वर्षांपूर्वी सांगितले आहे. त्यामुळे भारतीयांच्या जेवणात काळ्या मिठाचा वापर होता. ताटात वाढलेल्या जेवणात मीठ वापरण्याबाबत स्पष्ट बंदी होती, त्यामुळेच अनेक घरांमध्ये आणि कुटुंबांमध्ये काळे मीठ किंवा रॉक मीठ वापरले जाते. आता जागतिक आरोग्य संघटनेने मिठाच्या अतिवापराबाबत इशारा दिला असला तरी मीठ आरोग्यासाठी चांगले नाही हे स्पष्ट झाले आहे.