भावजयीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; वारंवार बलात्कार!
Jan 17, 2022, 12:35 IST
पुणे ः २५ वर्षीय भावजयीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत सावत्र दिराने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. गेल्या डिसेंबरमध्ये घडलेल्या या अत्याचार प्रकरणी पीडित महिलेने १५ जानेवारीला पिंपरी पोलिसांत धाव घेतली. त्यावरून सावत्र दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चोरून विवाहितेचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ सावत्र दिराने काढले होते. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी सावत्र दिराने महिलेला दिली होती. व्हिडिओ व्हायरल करायचे नसतील तर शारीरिक संबंधाची मागणी सावत्र दिराने केली. तिने नकार दिला असता त्याने १६ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास घरात घुसून तिला मारहाण केली व तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. तेवढ्यावरच न थांबता त्याने आणखी ४-५ दिवसांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. मात्र बदनामीच्या भीतीपोटी महिलेने या प्रकरणाची तक्रार दिली नव्हती. पतीने विश्वासात घेतल्यानंतर पतीसह तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.