प्रज्ञा सातव यांच्यासाठी भाजपची माघार!

 
file photo
कोल्हापूर (कव्हरेज गुरू वृत्तसेवा) ः दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसचेही प्रयत्‍न सुरू होते. आज, २२ नोव्‍हेंबरला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची घोषणा केली. पाटील सध्या कोल्हापुरात असून, ते पत्रकारांशी बोलताना म्‍हणाले, की प्रज्ञा सातव यांना राज्यसभेच्‍या उमेदवारीसाठी आमचा आग्रह होता. किमान उमेदवारी विधान परिषदेला मिळाल्याने भाजपकडून त्‍यांच्‍याविरोधात निवडणूक लढली जाणार नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली होती, असेही पाटील म्‍हणाले.