BIG BREAKING राज्याच्या राजकारणात धुमाकूळ! अजित पवार शिंदे - फडणवीस सरकार मध्ये सामील ..!

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात राष्ट्रवादीचे ५४ पैकी ४० आमदार आमच्यासोबत! डॉ. राजेंद्र शिंगणे कुणासोबत? वाचा...
 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.  शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील फुटली आहे. अजित पवार  यांनी काही वेळापूर्वी मंत्रीपदाची पदाची शपथ घेतली आहे. 
 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ४० आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे कुणासोबत?

दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे आता कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहेत. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात नाहीत. ते कुटुंबासह बाहेरगावी गेल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र सध्या ते नमेके कुठे आहेत ते कळू शकले नाही. सध्या त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. अजितदादांच्या सकाळच्या शपथविधीवेळी डॉ. शिंगणे उपस्थित होते, मात्र दुपारीच ते शरद पवारांच्या तंबूत परतले होते. त्यांनीच माध्यमांसमोर नेमके काय घडले त्याबद्दल सांगितले होते.