मित्रावर विश्वास ठेवून ती गेली अन्‌ तिघांच्या बलात्काराची शिकार झाली!

 
rape
ठाणे ः २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ हादरले आहे. जीआयपी डॅम परिसरात ही घटना समोर आली. शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी कल्याणमध्ये राहणारी असून, एका दुकानात ती काम करते. हनुमान हिलम आणि तरुणीची मैत्री होती. हनुमान आणि त्याचे दोन मित्र विश्वास मढावी आणि जावेद अन्सारी दारू पिण्यासाठी जीआयपी डॅम परिसरात गेले होते.

दारू पित असताना हनुमानने तरुणीला फोन केला व भेटायला बोलावले. तरुणीला आणण्यासाठी त्याने मित्राची रिक्षा पाठवली. तरुणी तिथे आल्यानंतर तिघांनी तिच्यादेखत भरपूर दारू ढोसत तिला घाबरविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक दारूची बाटली फोडली ती पोटात खुपसून खून करण्याची धमकी देत आधी हनुमान आणि नंतर विश्वास आणी जावेदने तिच्यावर आळीपाळीने बलात्‍कार केला. घटनेनंतर तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत पोलिसांना आपबिती कथन केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने तिघांनाही अटक केली आहे.