महिलांच्या या खराब सवयींमुळे पुरुष जातात त्‍यांच्यापासून दूर!

 
file photo
प्रामाणिकपणा आणि विश्वास असेल तर नाते टिकते. जोडप्यांत अनेकदा छोट्याछोट्या गोष्टींवरून वाद होतात. मात्र ते काही मिनिटांत सुटतात. मात्र असे वाद जर सतत होत असतील तर ती नात्यासाठी धोक्याची घंटा असते. नाते तुटण्यासाठी नेहमी पुरुषच जबाबदार असतात, असा आरोप महिलांकडून सातत्याने केला जात असला तरी तो तेवढा खरा नाही. अनेकदा महिलांच्या काही खराब सवयीमुळे पुरुष नाते तोडतात...
  • नात्यातले सिक्रेट्स दुसऱ्यांना सांगतात ः चांगल्या मित्राजवळ किंवा मैत्रिणीजवळ आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. मात्र अनेक महिला या पती- पत्नीमधील संबंधाबद्दलसुद्धा बेस्ट फ्रेंडला सर्व काही सांगून मोकळं होतात. मैत्रीचं नातं महत्त्वाचं असतंच, पण त्‍यापेक्षा कितीतरी पटीने जोडीदारासोबतच नातं महत्त्वाचं असतं हे लक्षात घ्यायला हवे. नात्यातले सिक्रेट्स कुणालाही सांगायचे नसतात. पुरुषांना या गोष्टी आवडत नसल्याने महिलांच्या या सवयीमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे स्वाभाविकच आहे.
  • दुसऱ्या पुरुषांशी जवळीक ः सध्याच्या आधुनिक युगात अनेक महिलांना पुरुषसुद्धा मित्र आहेत. ऑफिसमध्ये काम करताना अनेक पुरुषांशी ओळख होते. त्यातून जवळीकता वाढते. मात्र अशा पुरुषांशी मर्यादेपेक्षा अधिक जवळीक वाढत असेल तर तुमच्या पार्टनरला ते अजिबात आवडत नाही. नात्याला एक मर्यादा असते हे महिलांनी समजून घेणं आवश्यक आहे. दुसऱ्या मुलांशी जवळीक साधता साधता तुमचा आयुष्याचा जोडीदार तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही.
  • संशयी वृत्ती ः नात्यात विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे आहे. विश्वासामुळे नाते टिकते. मात्र तुमच्या जोडीदारांवर तुम्ही नेहमी संशय घेत असाल तर ते नाते फार काळ टिकत नाही. २४ तास नवऱ्यावर नजर ठेवणाऱ्या महिलांचे नाते फार काळ टिकत नाही.
  • सिगारेट, दारू पिणाऱ्या महिला ः दारू पिणाऱ्या, सिगारेट पिणाऱ्या महिला पुरुषांना आवडत नाहीत. मोजक्या पुरुषांना तशा महिला आवडत असल्या तरी भारतात महिलांनी दारू आणि सिगारेटचे सेवन करणे बहुतांश पुरुषांना आवडत नाही. ज्या महिलांना दारू आणि सिगारेटचे व्यसन असते, त्यांचे नाते फार काळ टिकत नाही.