आश्रमशाळेतील मुलीला घरी बोलावून तुझे कुणावर प्रेम आहे का म्हणत जबरदस्तीचा प्रयत्न!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार योगेश चव्हाण हा पालघर जिल्ह्यातील आसे येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या निवासी वसतिगृहावर अधीक्षक म्हणून नोकरीला आहे. पीडित विद्यार्थिनी या वसतिगृहात राहून आश्रमशाळेत शिकत होती. १४ डिसेंबरच्या दुपारी योगेशने मुलीला भांडे घासायचे म्हणून वसतिगृहाला लागून असलेल्या त्याच्या खोलीत बोलावले. तिने भांडे घासले.
त्यानंतर ती फरशी पुसत असताना योगेशने तिला कवटाळले. तिला बेडरूममध्ये नेत अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला. तुझे कुणावर प्रेम आहे का, असे म्हणत तो मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र तेवढ्यात शाळेतील एका महिला शिक्षिकेने हा प्रकार बघितला. शाळा व्यवस्थापनाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर माखोडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून योगेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.