संतापजनक...! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरूत विटंबना; शिवप्रेमी संतप्त

 
file photo
बेळगाव (वृत्तसंस्‍था) ः कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील सदाशिवनगरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून, संतप्त शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. १६ डिसेंबरच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग टाकून पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यामुळे शिवप्रेमींकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

rk

या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असून, बेळगावातील धर्मवीर संभाजी महाराज चौकात जमून शिवप्रेमींनी रस्ते बंद केले. आज १८ डिसेंबर रोजी शिवप्रेमींनी बेळगाव शहर बंद केले आहे. सकाळपासूनच या बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरातही या घटनेचे संतप्त प्रतिसाद उमटत असून शिवसैनिक रस्त्यावर उतरले. कर्नाटकातील हॉटेल व्यावसायिकांच्या हॉटेल शिवसैनिकांनी बंद केल्या आहेत.