अनिल देशमुखांना दिलासा नाहीच... "ईडी' कोठडीत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढ!

 
anil deshmukh
मुंबई ः माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा मिळण्याची चिन्‍हे दिसत नाहीत. १२ नोव्‍हेंबरला त्‍यांची अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडीची मुदत संपणार होती. मात्र आणखी १५ नोव्‍हेंबरपर्यंत कोठडीतील मुक्काम वाढला आहे. तसे आदेश ईडीने दिले आहेत.
देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. सीबीआयने सुद्धा या प्रकरणात गुन्‍हा दाखल केला अाहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी देशमुखांवर १०० कोटींची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. बडतर्फ एपीआय सचिन वाझेने मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले होते. ही रक्कम देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना वाझेने दिली होती. पालांडे ही रक्‍कम घेऊन नागपूरला गेले. त्यांनी तिथे एका व्यक्तीला है पैसे दिले. हवाला चॅनेलद्वारे हे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते. नंतर जैन बांधवांनी तेच पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुखांच्‍या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केले, असा आरोप ईडी केला आहे.