सापावर पाय पडला पण साप नाही चावला, तरीही ८ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू!

 
child
कोल्हापूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): साप म्हटल की अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो..पावसाळ्यात सर्पदंशाने अनेकांना जीव गमवावा लागतो,तर काही नुसत्या भीतीने गंभीर आजारी पडतात..कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे गावात घडलेल्या एका घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ८ वर्षीय चिमुकल्याचा खेळताना सापावर पाय पडला, त्याला कोणताही दंश सापाने केला नाही..मात्र  तरीही त्याचा मृत्यू झाला.
 

घटना अशी आहे की, अर्णव नवनाथ चौगले(८) हा गावातल्या एका खासगी इंग्रजी शाळेत शिकत होता. ४ दिवसांपूर्वी शाळेच्या मैदानात खेळता खेळता त्याचा सापावर पाय पडला, ही बाब त्याच्या लक्षात येताच त्याने प्रचंड आरडाओरड केली, तो खूप घाबरला..

  ही गोष्ट घरच्यांना माहीत झाली, मात्र अर्णव च्या अंगावर सर्पदंश झाल्याचे कोणतेही लक्षण नव्हते,त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र त्या रात्री अर्णव ला जोराचा ताप भरला,त्यामुळे त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 रुग्णालयात सर्व तपासण्या झाल्यावर त्याला सर्पदंश झाला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र प्रचंड भीतीमुळे त्याचा ताप मेंदूत शिरला. कुटुंबीयांनी त्याला शासकीय दवाखान्यातून खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र त्याचा ताप कमी झाला नाही, तो अत्यवस्थ अवस्थेत गेला आणि अखेर रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.