खाकीच्या कर्तव्यपूर्तीला तुम्ही पण सॅल्यूट ठोकणार!एसपींची पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप! वाचा... कोणत्या पोलीस ठाण्यांनी केली कामगिरी?

 
ujyg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  क्षेत्र कुठलेही असो चांगले काम केले की,कौतुक हे होतेच आणि ही पाठीवरची कौतुकास्पद थाप स्फूर्ती देणारी ठरते.जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी देखील  जिल्ह्यातील पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी गतवर्षातील बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पारितोषिक देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला. हा गौरव सोहळा ७ जानेवारीला पोलीस मुख्यालयातील प्रभा हॉलमध्ये पार पडला.

पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार नव्यानेच हाती घेतला. त्यांनी पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी  विशेष प्रयत्न चालविले आहे. पोलिसांनी दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट पद्धतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध करणे, तांत्रिक पद्धतीच्या तपासात वापर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणे आदी महत्त्वपूर्ण टिप्स पोलीस दलात रुजविण्याकडे आवाड यांचा कल आहे. या उद्देशानेच पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचा 'गुणगौरव विशेष कार्यक्रम' घेण्यात आला. माहे डिसेंबर २२ आणि संपूर्ण २०२२ वर्षातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस ठाण्यांतील अधिकारी, अंमलदारांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक सारंग आवाड होते. अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी, सचिन कदम, विलास यामावार, प्रभारी उपनिरीक्षक गिरीश ताथोड, प्रभारी एलसीबी प्रमुख अशोक लांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माहे डिसेंबर २०२२ ची कामगिरी

सीसीटीएनएस मध्ये (अ श्रेणीत) मलकापूर, मेहकर शहर पोलीस ठाणे तर (ब श्रेणीत) बीबी, जानेफळ शहर पोलीस ठाणे, मुद्देमाल निर्गतीमध्ये (अ श्रेणीत) बुलडाणा, मलकापूर शहर पोलीस ठाणे,(ब श्रेणीत) अमडापूर व साखरखेर्डा पोलीस ठाणे तसेच गुन्हे निर्गतीमध्ये (अ श्रेणीत) बुलडाणा, खामगाव शहर पोलीस ठाणे,(ब श्रेणीत) साखरखेर्डा, डोणगाव पोलीस ठाणे, दोषसिद्धी मध्ये (अ श्रेणीत) नांदुरा व मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे, (ब श्रेणीत) शेगाव ग्रामीण, किनगाव राजा पोलीस ठाणे तसेच गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये  (अ श्रेणीत) चिखली,नांदुरा पोलीस ठाणे,(ब श्रेणीत) अमडापूर पोलीस ठाणे यांचा समावेश असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरवांकित करण्यात आले. 

संपूर्ण २०२२ वर्षातील कामगिरी

सीसीटीएनएस मध्ये (अ श्रेणीत) चिखली मलकापूर शहर पोलीस ठाणे,(ब श्रेणीत) बीबी, जानेफळ पोलीस ठाणे,मुद्देमाल निर्गतीमध्ये (अ श्रेणीत) जळगाव जामोद ,चिखली पोलीस ठाणे,(ब श्रेणीत) अमडापूर, अंढेरा पोलीस ठाणे, तसेच गुन्हे निर्गतीमध्ये (अ श्रेणीत) बुलडाणा शहर, चिखली पोलीस ठाणे,(ब श्रेणीत) अंढेरा, साखरखेर्डा पोलीस ठाणे,दोषसिद्धीमध्ये (अ श्रेणीत) चिखली, नांदुरा पोलीस ठाणे (ब श्रेणीत) शेगाव ग्रामीण, सोनाळा पोलीस ठाणे तसेच गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये  (अ श्रेणीत) बुलडाणा,मलकापूर शहर पोलीस ठाणे,(ब श्रेणीत) किनगाव, हिवरखेड पोलीस ठाणे यांचा समावेश असून या अधिकारी व अंमलदारांचा कार्य गौरव झाला.