STATE NEWS काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? नितीन गडकरींनी खर खर सांगून टाकल...
Updated: Sep 12, 2022, 13:38 IST
नागपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं भाजपमध्ये खच्चिकरण सुरू असल्याची चर्चा पत्रकारांमध्ये तसेच विरोधी पक्षांमध्ये अनेकदा होत असते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींनी काँग्रेसमध्ये यावं,आम्ही त्यांचं स्वागत करू असं विधान केलं होत. याबद्दल तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का असा सवाल गडकरींना पत्रकारांनी के केला यावर गडकरी यांनी आपण स्वप्नातही भाजप सोडणार नसल्याचे सांगितले.
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. भाजपचा कार्यकर्ता आहे. आयुष्यभर विचारांप्रमाणे काम करीन याबद्दल माझ्या मनात स्पष्टता आहे असे गडकरी म्हणाले. कुणी काय बोलावं ,काय आमंत्रण द्यावं हा ज्याचा त्याचा विषय आहे असे गडकरी म्हणाले. दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेल्या गडकरींना केंद्रीय निवडणूक समिती व भाजपच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आले होते. त्यानंतर गडकरी यांचे खच्चिकरण करण्यात येत असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपची कार्य करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हयातभर माझी खुर्ची दुसऱ्याला मिळू नये असा विचार असणाऱ्या नेत्यांना भाजपची पद्धत कळणार नाही. आधी राष्ट्र, नंतर पक्ष व त्यानंतर व्यक्ती हा आमचा विचार आहे असे गडकरी म्हणाले.