वर्धा हादरला! तीन अल्पवयीन मुलींचे ५६ वर्षीय विकृताने केले लैंगिक शोषण!!

 
वर्धा ः ५६ वर्षीय विकृताने दोन सख्ख्या बहिणींसह एका चिमुकलीवर लैंगिक अत्‍याचार केल्याची घटना समोर आल्याने वर्धा अक्षरशः हादरून गेला आहे. गिरड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात ही घटना समोर आली आहे. गिरड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्‍याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

केशव बावसू वानखेडे (रा. माकुना सावळी, ता. चिमूर जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. तो लोखंडी पिपे विक्री करतो. गावागावात जाऊन लोखंडी पिपे विकायचा. काही दिवसांपूर्वी गिरड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात तो गेला. रस्त्याच्या कडेला बसून तो पिपे विकू लागला. याच दरम्‍यान त्‍याची नजर सहा वर्षांच्या दोन सख्खा बहिणींवर पडली. त्‍याने त्‍यांच्या अज्ञानाचा फायदा उचलून रस्त्याच्या कडेला ओसाड पडीक जागेवर नेले.

तिथल्या बाथरूममध्ये नेऊन रात्रीच्या काळोखात त्‍यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. याच गावात असताना ७ वर्षीय चिमुकलीवरही अत्याचार केला. सख्या बहिणींनी ही बाब आई- वडिलांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडित चिमुकल्यांच्या आईवडिलांनी गिरड पोलीस ठाण्यात धाव घेऊन केशव वानखेडेविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेळ न दवडता तातडीने केशवच्या मुसक्या आवळल्या. चौकशीने त्‍याने अत्याचार केल्याची कबुली दिली.