लफडेबाज बायकोन स्वतःच कुंकू पुसल; प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला धाडले देवाघरी, आता तिला घडणार जेलची वारी!
पोलिसांनी आरोपी मनीषा, तिचा प्रियकर सुभाष संसारे आणि त्याच्या एका मित्राला याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा झाल्टे हीचे काही वर्षांपासून सुभाष संसारे याच्याशी अनैतिक संबंध होते. मनीषचा नवरा ट्रकचालक होता व शेतीचा व्यवसाय सुद्धा सांभाळायचा. नवरा ट्रक घेऊन गेला की आठवडा आठवडा बाहेर असायचा ,त्याकाळात तिला सुभाष संसारे याची गोडी लागली. दोघांचे प्रेम जडले. नवऱ्यापेक्षा मनिषाला आता प्रियकर जवळचा वाटू लागला होता. त्याच्यासोबत बिनधास्त जगता आले पाहिजे म्हणून नवऱ्याचा काटा काढायचा तिने प्लॅन रचला.
दोन दिवसांआधी नवरा मळ्यात झोपायला गेल्याचे तिने प्रियकर सुभाषला सांगितले. सुभाष त्याच्या एका मित्राला घेऊन मळ्यात पोहचला. झोपेत असलेल्या मनिषाच्या नवऱ्याच्या डोक्यात त्यांनी लाकडी दांडक्याने प्रहार केले, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
खून कुणी केला याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांना मनिषाचे लफडे असल्याचे कुणकुण लागली. त्यामुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता ती उडवा उडवीची उत्तरे देऊ लागली. संशय वाढल्याने तिचा प्रियकर सुभाषला ताब्यात घेउन पोलिसांनी चौकशी केली, त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिल्याने पोलिसांनी मनीषा , तिचा प्रियकर व त्याच्या मित्राला अटक केली आहे.