"या' वयात महिलांच्या डोक्‍यात येऊ शकतो फसवणुकीचा विचार!

 
मुंबई ः फसवणुकीच्या बाबतीत आतापर्यंत फक्त पुरुषांचीच नावे खराब होती. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनाचा अहवाल तुम्ही वाचलात तर हैराण व्हाल! ऐकायला हे विचित्र वाटेल पण या अहवालानुसार १८ ते २९ वयोगटातील महिला फसवणूक करण्यात आघाडीवर असतात. त्‍यांना जोडीदाराचा पटकन कंटाळा तर येतोच, पण जोडीदाराची फसवणूक करण्याबरोबरच त्‍या नवीन जोडीदार शोधू लागतात. एखाद्या महिलेने वयाच्या २९ व्या वर्षी लग्न केले, तर ३६ ते ३७ वयोगटात असताना ती तिच्या पतीची फसवणूक करण्याची शक्यता जास्त असते.

आयरिश डेटिंग वेबसाइटने केलेल्या अभ्यासानुसार, फसवणूक करण्यासाठी सर्वात धोकादायक वय ३९ वर्षे आहे. याचे कारण असे की ४० पर्यंत पोहोचलेल्या लोकांचे हृदय खूप वेगाने अस्वस्थ होते. या अभ्यासानुसार, १९ ते २९, ३८ ते ४९ वयोगटातील लोक जोडीदाराची फसवणूक करतात.

विशेष म्हणजे त्यांना या वयात त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेले लोक आवडायला लागतात. आयरिश डेटिंग वेबसाइटचे प्रवक्ते म्हणतात, की आम्ही १००० लोकांच्या प्रोफाइलचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. अभ्यासात त्यांनी स्त्री आणि पुरुष दोघांचा समावेश केला. मात्र फसवणूक करण्यात महिलांचा वाटा पुरुषांपेक्षा जास्त निघाल्याचे ते सांगतात.

  जर आपल्या जोडीदाराची फसवणूक टाळायची असेल तर त्यांनी वयाच्या या टप्प्यावर सावधगिरी बाळगली पाहिजे, असेही ते म्‍हणतात. या काळात केवळ तुमच्या जोडीदारावर प्रेम करणे पुरेसे नाही. त्यांची अतिरिक्त काळजी घ्या. जेणेकरून त्यांना तुमच्याबद्दल अधिक प्रेम वाटेल. विवाहित महिलांबद्दल त्यांचा अहवाल सांगतो, की लग्नाच्या सात वर्षांनंतर स्त्रिया आपल्या पतीची फसवणूक करण्याचा विचार करतात. कारण लग्नाच्या सात वर्षांनंतर पती-पत्नीमधील प्रेमाची उत्कटता कमी होते.