State News: लग्नानंतरच्या त्या रात्री पत्नीला कळाले त्याचे रहस्य! पोलिसांना म्हणाली, तो काहीच कामाचा नव्हता! त्याला "ती" नाही तर "तो" आवडायचा!
तिने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती इंजिनियर असून मुंबईत कुटुंबासह राहतो. जानेवारी महिन्यात त्यांचे लग्न झाले. लग्नात तिच्या वडिलांनी १० लाख रुपये हुंडा व १० तोळे सोन्याचे दागिने दिले होते. मात्र लग्नानंतर बरेच दिवस उलटूनही तो हनिमूनसाठी पुढाकार घेत नव्हता. याशिवाय कुठलेही कारण नसतांना तिला मारहाण करायचा. दरम्यान एका रात्री तो मोबाईलवर काहीतरी व्हिडिओ पाहत असल्याचे तिने बघितले.
तिने त्याचा मोबाईल तपासला असता तो इंटरनेटवर समलिंगी मुलांच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ पाहत असल्याचे तिला दिसले. तिने विचारणा केली असता मला हेच आवडते मला तुझ्यात इंटरेस्ट नाही असे त्याने स्पष्टपणे सांगितले. केवळ समाजाच्या भीतीपोटी लग्न केल्याचे त्याने सांगितले. त्याला केवळ १६ ते २१ या वयोगटातील मुले आवडतात असेही त्याने सांगितले. हा प्रकार ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने घडला प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली असून नवरा काहीच कामाचा नाही असे तिने तक्रारीत म्हटले आहे.