State News राज्यात हे काय चाललय; ९ वर्षांच्या मुलाने केले शेजारच्या ४ वर्षाच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण!

 
 ठाणे :- सहज उपलब्ध होणारा स्मार्टफोन, फुकटचे इंटरनेट यामुळे लहान वयाच्या मुलांच्या पाहण्यात नको त्या गोष्टी येतात. परिणामी लहान मुले सुद्धा गुन्हेगारीकडे वळत आहेत. ठाणे शहरातील उल्हासनगर भागात ९ वर्षाच्या मुलाने घराशेजारी राहणाऱ्या ४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. 
  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर भागात ही घडली.  ३ एप्रिल रोजी ९ वर्षाने मुलाने ४ वर्षांच्या चिमुरडीला निर्जनस्थळी नेले आणि तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर मुलीच्या गुप्तांगात सातत्याने वेदना होत होत्या. जेव्हा  तिने ही माहिती आईवडिलांना दिली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ९ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.