संजय राऊत शिवसेनेचा भोंगा! सेनेवाल्यांना काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा वाईट दिवस येतील! भाजपच्या या नेत्याचा हल्लाबोल

 
जळगाव( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहेत. हा भोंगा दररोज सकाळी वाजतो. शिवेसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा वाईट दिवस येणार आहेत आणि याला कारणीभूत शिवसेनेचेच नेते राहणार आहेत अशी घणाघाती टीका भाजपचे नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधतांना गिरीश महाजन बोलत होते.
शिवसेनेवाल्यानी शॉर्ट टर्म चा विचार करून मुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र त्यांनी दूरवरचा विचार केला असता तर त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली नसती. पुढील काळात त्यांची अवस्था राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा अधिक वाईट होणार आहे असे गिरीश महाजन म्हणाले. शिवसेनेची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस वाईट होत आहे. सातत्याने किरीट सोमय्या , इडी विरुद्ध ते संजय राऊत भोंगा वाजवतात . रोज सकाळी सकाळीच त्यांचा भोंगा वाजतो असे गिरीश महाजन म्हणाले.
 
सहाव्या जागेवर भाजपचाच विजय होईल!
 

दरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेवर सुद्धा भाजपचाच विजय होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही घोडेबाजार करणार नाही. आमचे उमेदवार धनंजय महाडिक हमखास विजयी होतील असे गिरीश महाजन म्हणाले. यावेळी भाजपने निष्ठावंतांना उमेदवारी दिली नसल्याचा शिवसेनेचा आरोप गिरीश महाजन यांनी फेटाळून लावला. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटे तुमच्याकडे असतात हे लक्षात घ्या. तुम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्या प्रियांका चतुर्वेदी, राजकुमार धूत, प्रीतीश नंदी, संजय निरुपम हे निष्ठावंत शिवसैनिक होते का असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. महाजन यांच्या टीकेला शिवसेनेकडून कसे उत्तर मिळते याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.